विल्यम सॉमरसेट मॉम : लेखकांच्या दुसऱ्या पंगतीतल्या पहिल्या खुर्चीतला लेखक
आपल्या हयातीत लोकप्रिय असणारे अनेक लेखक वा कलाकार असतात, परंतु मृत्यूपश्चातही जागतिक लोकप्रियता दीर्घकाळ टिकून राहणारे लेखक तसे मोजकेच. सॉमरसेट मॉम हे अशा मोजक्या लेखकांपैकी एक. जगात जिथे जिथे म्हणून इंग्रजी साहित्य पोचले, तिथे तिथे त्यांचा जयजयकार झाला. त्यांच्या असंख्य वाचकांचे त्यांना निर्व्याज प्रेम लाभले. अर्थात या देदीप्यमान यशामागे त्यांची आयुष्यभराची कठोर मेहनत आहे, हे सांगणे न लगे.......